Maval : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज – श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा सन 2018-19 या एकविसाव्या गळीत हंगामाचा ब़ॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ सोमवारी (दि. 24) साजरा झाला.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब जयवंत भेगडे, छाया भेगडे, श्री संत तुकाराम महाराज देहु संस्थानचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज मोरे (इनामदार), माजी मंत्री मदनशेठ बाफना, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार दिगंबर भेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ टिळे, पी. डी. सी. बॅंकेचे संचालक आत्माराम कलाटे, माजी संचालक रमेश जोरी, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बबनराव साखरे, तसेच देहु देवस्थानचे विश्वस्त विठ्ठल महाराज मोरे, सुनील दिगंबर मोरे, विश्वजीत महाराज मोरे, तसेच काऱखान्याचे संचालक माऊली दाभाडे, अनिल लोखंडे, सुभाष मोरे, भाऊसाहेब भोईर, अंकुश आंबेकर, चेतन भुजबळ, प्रल्हाद केमसे, धैर्यशील ढमाले, बाळकृष्ण शिंदे, सुभाष बोडके, पांडुरंग ठाकर, अरुण काळजे, बाळकृष्ण कोळेकर, संचालिका स्वाती भेगडे, कुंदा विनोदे, तज्ञ संचालक अॅड. ज्ञानेश नवले, शासन नियुक्त संचालक गोपीचंद गराडे, एम. एस . सी बॅंक स्थायी तपासणी अधिकारी आर. जे. सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. दुर्वे, कार्यकारी संचालक एस. जी. पठारे तसेच सभासद शेतकरी. कारखाना अधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते.

गळीत हंगाम हा शासनाच्या धोरणाप्रमाणे सुरु होणार असून कारखान्याने गळीत हंगाम करिता वाहन टोळ्या व टायर बैलगाडी करार केलेले आहेत. कारखाना गळीत हंगाम करीता ८ हजार ३०७ हेक्टर ऊसाची नोंद असून त्यामधून गळीतासाठी ६ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी दिली.

कारखाना वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटच्या ऊस उत्पादकता व साखर उतारा वाढीसाठी प्रोत्साहनात्मक पारितोषिक योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वसंतदादा शुगर इन्सिट्युटचे कृषी संचालक निवृत्त आय.ए.एस. अधिकारी विकास देशमुख यांनी नुकतीच काऱखान्यास भेट दिली. त्या प्रसंगी त्यांनी कारखान्याची पाहणी करुन सर्व माहिती घेतली.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रात ऊसात वाढणाऱ्या वेली व कशाळ गवत यांचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करावे. दर तीन वर्षांनी ऊस बेणेत बदल करावा. कारखाना कार्यक्षेत्रात व्हर्मी कंपोस्ट, बायोफर्टिलायझर व ठिबक सिंचनचा वापर करुन एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सुचविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.