Pimple Saudagar : पी. के.चौक ते जर्वरी सोसायटी समोरील रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटणार

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील पी. के.चौक ते जर्वरी सोसायटी समोरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी पाठपुरावा केला होता.

परिसरातील नागरिकांना तसेच वाहनचालकांना या रस्त्यावरून जाताना फार त्रास सहन करावा लागत होता. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी तातडीने स्थापत्य विभाग अधिकारी सोबत पाहणी करून लवकरात लवकर या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थापत्य विभागाने युद्ध पातळीवर सदर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.