Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेने वर्तमानपत्र वाटप करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- अज्ञात वाहनांची धडक बसून वर्तमानपत्र वाटप करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात काल शुक्रवारी (दि.28) सकाळी साडेसहा च्या दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयासमोरील मनपाच्या वाहनतळासमोर घडला.

रोहित रवींद्र कांगणे (वय 28, रा. फर्ग्युसन कॉलेज कॅम्पस) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी किशोर गजमल (वय 44, रा. सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित कांगणे त्यांच्या दुचाकीवरून वर्तमानपत्र वाटप करण्यासाठी जात असताना अचानक अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रोहित गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासहित घटनास्थळावरून पसार झाला. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.