Pune : पेट्रोल 4.35 तर डिझेल 2.59 पैशानी स्वस्त!

एमपीसी न्यूज- पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये सातत्याने होणारी वाढ आज अखेर थांबली आणि पेट्रोल 4.35 पैशानी तर डिझेल 2.59 पैशानी झाले आहे. गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पेट्रोल डिझेल स्वस्त होणार असल्याचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीत अडीच रुपयांची कपात केली. तर राज्य सरकारने केवळ पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल प्रतिलिटर पाच रुपये आणि डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे.

पुण्यातील पेट्रोल डिझेलचा आजचा भाव पुढीलप्रमाणे-

पेट्रोल- 86.81
डिझेल 76.10
पॉवर – 89.57

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.