Khadakwasala : आईला वाचवण्यास गेलेल्या दोघा भावंडांना जलसमाधी

एमपीसी न्यूज – आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघा भावा-बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रविवारी(दि. 7) दुपारी दीडच्या सुमारास पानशेत धरण परिसरात घडली.

प्रथम ऊर्फ कुणाल दत्तात्रेय भगत (वय 17) व वैष्णवी दत्तात्रेय भगत (वय14) अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम व वैष्णवी हे दोघेजण आपली आई सविता, मावसभाऊ व काका यांच्यासोबत कपडे धुण्यासाठी पानशेत धरण परिसरात गेले होते. कपडे धुवत असताना सविता यांचा पाय घसरला व त्या खोल पाण्यात पडल्या. त्यावेळी कुणालचा मावसभाऊ त्यांना वाचवण्यासाठी गेला असता आईला वाचवण्यासाठी या दोघांनी देखील पाण्यात उडी मारली.

कुणालच्या मावसभावाने सविता यांना पाण्याबाहेर काढले परंतु कुणाल व वैष्णवी त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. भावंडांचा पाण्यात शोध घेतला असता दुपारी सव्वाचारच्या दरम्यान त्या दोघांचे मृतदेह मिळाले. घडलेल्या दुर्दैवी प्रकाराबद्दल सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.