Pimpri : फेरीवाला कायद्यानुसार लाभ देण्याच्या मागणीसाठी टपरीधारकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – हातगाडी टपरीधारकांना फेरीवाला कायद्यानुसार लाभ देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर शुक्रवारी (दि 26) आंदोलन करण्यात आले.

या आंदोलानात प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफ़ान चौधरी, उपाध्यक्ष साईनाथ खंडीजोड़, मनपा समिति सदस्य राजेन्द्र वाघचौरे, मनीषा राउत, अरुणा सुतार, समाधान जावळे, बिलाल तांबोळी, सुरेश देड़े, वासुदेव मनुरकर, सय्यद अली, राजेन्द्र जाधव, आयविन फर्नांडिस, फातिमा शेख, नसीमा तंबोळी, खातेजा राजनाळ, सुलोचना मिरपगारे, सरिता वठोरे, नंदा तेलगोटे,अरुण मेहर, पुष्पा सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी आदींसह विविध भागातील हातगाड़ी, टपरी धारक उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह अभियंता राजन पाटील यांना निवेदन देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या स्थापनेपासून फेरीवाले अस्तित्वात आहेत. फेरीवाला कायदा झाला आहे, ही समाधानाची बाब असली तरी शहरात व्यवसाय करणारे हातगाड़ी, टपरी, स्टॉलधारक यांना जो पर्यंत कायद्यानुसार लाभ मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार आंदोलना दरम्यान करण्यात आल्याचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी सांगितले.

यावेळी अनिल बारवकर म्हणाले, “पिंपरी चिंचवड मनपाकडून फेरीवाला कायदा धाब्यावर बसवून शहरातील फेरीवाल्यावर कारवाई सुरू आहे. फेरीवाला कायदा असताना जीव मुठीत घेउन जगत आहे”

मनीषा राउत म्हणाल्या, ” शहर फेरीवाला समितीची बैठक घ्यावी, फेरीवाल्यावरील अन्यायकारक कारवाई थांबवावी, भक्‍ती- शक्‍ती शिल्प पर्यटनस्थळाजवळ होकर्स झोन करण्यात यावा, अन्यायकारक दंड रद्द करावा आदी मागण्या करण्यात आल्या”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.