Pimpri : अण्णाभाऊ साठे, नेल्सन मंडेला यांना कष्टकऱ्यांतर्फे विनम्र अभिवादन

एमपीसी न्यूज – आयुष्यभर कष्टकरी कामगारांच्या व्यथा आणि कथासंग्रह, पोवाडाच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच वर्णद्वेष, विषमता नष्ट होऊन समतेसाठी प्रयत्न करणारे नेल्सन मंडेला यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.

Pimpri : बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको;  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, माध्यम प्रमुख उमेश डोर्ले, सागर बोराडे, फरीद शेख,रफिक गोलंदाज, नदीम पठाण, मनोज यादव,हरी भाई, अंबालाल सुखवाल, सलीम डांगे,माधवलाल तेली, सहदेव व्हणमाने, मधू गुप्ता आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की अण्णाभाऊनी ३५ कादंबऱ्या, १९ कथा ज्या होत्या त्यातील पात्र सामान्य ,पीडित घटकातील होते. कामगारांवर होत असलेल्या अन्यायाला त्यांनी नेहमी वाचा फोडली . महात्मा गांधी यांना आदर्श मानणारे नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिका येथे वर्णद्वेषविरुद्ध मोठी लढाई केली.

सरकारच्या दडपशाहीमुळे मंडेला यांच्या मागे जनता उभी राहिले हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. मात्र कृष्णवर्णीयांच्या हिताचे नसलेले अनेक कायदे केल्यामुळे जनतेने त्यांना साथ दिली. शेवटी त्यांची ताकद लक्षात घेऊन गोऱ्या सरकारने मंडेला यांच्या पक्षाबरोबर वाटाघाटी केल्या आणि अखेर ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.