Pimpri : देशभ्रमण करणारे संजय कदम यांचा कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे सत्कार

एमपीसी न्यूज –  भटक्या विमुक्त नागरिकांसाठी ( Pimpri ) अविरत कार्य करणारे संजय कदम हे जाती –  जनजाती जोडो अभियानद्वारे 20 राज्यात फिरून 88 हजार किलोमीटर दौरा करून  2 कोटी लोकांशी संपर्कसाधून साडेपाच वर्षांपासून ही यात्रा देशभरात करत आहेत. 218 जाती- जनजाती त्यांचे शैक्षणिक , आर्थिक, सामजिक सर्वेक्षण करत असून पिंपरी-चिंचवड येथे आले असता त्यांचा कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे  कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे हस्ते  शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस  ओबीसी सेल शहर अध्यक्ष विशाल जाधव, विशाल क्षीरसागर, संतोष कदम सलीम डांगे,उमेश डोर्ले, रवींद्र गायकवाड, रणजित गायकवाड  आदी उपस्थित होते.

Dehuraod : भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांचा ‘योगीराज भूषण पुरस्कारा’ने सन्मान

यावेळी नखाते म्हणाले की, भटक्या विमुक्त लोकांचा आधार म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन , आणि व्यसनातून मुक्त करण्याचा प्रयत्न  संजय कदम करीत आहेत.  त्यांना भेटून देशभरातील भटक्या विमुक्त त्याचबरोबर कारागीर आणि असंघटित कामगारांचे प्रश्न जाणून घेता आले आणि राष्ट्रीय ( Pimpri ) स्तरावरती असंघटित कामगारांच्या बाबतीत होणाऱ्या बैठका मिळावे याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

लवकरच दिल्ली येथे एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे, यासाठी संजय कदम आणि राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष यांच्या माध्यमातून असंघटित कामगारांची सामाजिक सुरक्षाबाबत पाठपुरावा केला जाणार आहे.

जाधव म्हणाले की, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले असून संजय कदम यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये आम्ही भटक्या विमुक्त व ओबीसी समाजाला एकत्रित घेऊन एक कार्यक्रमाचे आयोजन ( Pimpri ) करणार आहोत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.