Pune : विद्यावत्सल क्रांतीकिरण अन्नाप्रगडा यांचे निधन

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे संस्थापक विद्यावत्सल क्रांतीकिरण अन्नाप्रगडा (वय 61) यांचे शुक्रवारी (दि २६) दुपारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, आत्या तसेच अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा मित्रपरिवार आहे.

विद्यावत्सल अन्नाप्रगडा हे सातपुडा आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक होते. आणिबाणीविरुद्धच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना दुर्गभ्रमंतीची विशेष आवड होती.

सोमवारी (दि. २९) ससून हॉस्पिटल, अॅनेटॉमी विभाग येथे सकाळी ११ ते ११.३० वाजेपर्यंत विद्यावत्सल अन्नाप्रगडा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्याच दिवशी दुपारी २ वाजता विद्यावत्सल यांच्या घरी शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.