Lonavala : पदपथ‍च्या जागेवर वाहन पार्किंगचे अतिक्रमण

107

एमपीसी न्यूज- लोणावळा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कुमार चौकातून प्रवेश केल्यानंतर रेल्वे पूल व माॅल समोर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याकरिता लोणावळा नगरपरिषदेने रस्त्याच्या कडेला असलेला पदपथ तोडून त्याठिकाणी रस्ता रुंदीकरण केले. मात्र या जागेचा वापर सध्या वाहने उभी करण्यासाठी होऊ लागला असल्याने याठिकाणी पुन्हा वाहतूक कोंडी होऊ ल‍ागली आहे. पादचाऱ्यांना धोकादायकरित्या रस्त्यावरुन चालावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

HB_POST_INPOST_R_A

कुमार चौक ते मावळ पुतळा चौक दरम्यान रस्ता रुंद करण्यात आला असला तरी रेल्वे उड्डाणपूल व माॅल समोरील वळणावर रस्ता अरुंद असल्याने या भागात सतत वाहतूक कोंडी होत असते, ही कोंडी सोडविण्यासाठी नगरपरिषदेने जीर्ण झालेल्या पदपथाचा बळी देत त्याठिकाणी रस्ता रुंदीकरण केले यामुळे रुंद झालेल्या रस्त्यावर आता बेशिस्त वाहनचालक, स्थानिक नागरिक व पर्यटक वाहने उभी करु ल‍ागल्याने सदरच्या जागेवर वाहन पार्किंगचे अतिक्रमण झाले आहे. या भागात पायी चालणारे नागरिक व पर्यटकांची वर्दळ ध्यानात घेता पदपथ असणे खूप गरजेचे आहे. पदपथ तुटल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालत रस्त्यावरुन पायी चालावे लागत आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: