Wakad : व्यवसायासाठी पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – व्यवसाय करण्यासाठी माहेराहून पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना वाकड परिसरात घडली.

पती बाळकृष्ण रमेश वाघमारे, सासू व सासरे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळकृष्ण यांच्या पत्नीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण यांचा 2017 मध्ये विवाह झाला. लग्नानंतर सहा महिन्यांनी व्यवसाय करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणले नसल्याच्या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून छळ करण्यास सुरवात केली. तसेच कौटुंबिक कारणावरून शिवीगाळही केली. शिळे अन्न खाण्यास देणे, उपाशी ठेवणे असा त्रास दिला. तसेच अंगावर रॉकेल ओतून जाळून टाकण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.