Shivajinagar – माहितीच्या अधिकाराखाली बांधकामासंदर्भात माहिती मिळवून 10 लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज-  माहितीच्या अधिकाराखाली बांधकामासंदर्भात माहिती मिळवून 10 लाखांची खंडणी स्विकारणा-या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि.1) सायंकाळी 8 च्या सुमारास शिवाजीनगर येथील गंधर्व हॉटेल येथे ही खंडणी स्विकारण्यात आली आहे.

याप्रकरणी एका 31 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी आशुतोष अरूण घोलप (वय 45, रा. कोथरूड) आणि येरवडा येथे राहणा-या एका 65 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दोघांनी मिळून माहितीच्या अधिकाराखाली पुणे महानगरपालिकेकडून फिर्यादी यांच्या बांधकामासंदर्भात माहिती मागविली आणि अतिक्रमण विभागाकडे तक्रार देऊन पूढील कारवाई न करता ते बांधकाम न तोडण्यासाठी त्यांच्याकडे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत 20 लाखांची खंडणी मागितली. दरम्यान तडजोडीअंती 10 लाखांची खंडणी मागितली. त्या दोघांनी मिळून फिर्यादी यांच्याकडून शिवाजीनगर येथील गंधर्व हॉटेलमध्ये 1 डिसेंबरला फिर्यादी यांच्याकडून 10 लाखांची खंडणी स्विकारली.

याप्रकरणी खंडणी स्विकारणा-या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.