Pune: कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘परिक्रमा’ नृत्यमहोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्युज : म.ए.सो. रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलमध्ये कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे 6 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी ‘परिक्रमा’ नृत्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. 

सुप्रसिद्ध नृत्यांगना सुचेता भिडे – चाफेकर यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्याने त्यांच्या सर्व शिष्यांनी मिळून त्यांना दिलेली गुरुदक्षिणा म्हणजे ‘परिक्रमा’ नृत्यमहोत्सव! या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर  होते.  म.ए.सो. तर्फे नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर यांचा सत्कार एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आला.महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा या कार्यक्रमात सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे , उपाध्यक्ष डॉ. माधवजी भट व आजीव मंडळाच्या सदस्या डॉ. मानसी भाटे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.