Vadgaon Maval : ह भ प आप्पासाहेब कराळे पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणदिनानिमित्त कीर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज- स्वर्गीय ह भ प आप्पासाहेब तथा ज्ञानोबा नामदेव कराळे पाटील भक्त परिवार व संत श्रेष्ठ सदगुरू निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आप्पांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन महोत्सव आणि जगद्गुरू तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 2) रोजी या सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले. दि. 9 एप्रिल पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

उदघाटन प्रसंगी गुरूवर्य माऊली महाराज कदम, ह भ प भागवताचार्य एकनाथ महाराज गोळेसर, ह भ प मनोहर महाराज सायखेडे, हभप सोपान काका गोळे, भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त रामभाऊ कराळे पा., सचिव जोपाशेठ पवार, ह भ प मनोहरपंत ढमाले मामा, भंडारा डोंगराचे निसीम सेवक शांताराम कराळे उपस्थित होते.

माऊली महाराज कदम म्हणाले, ” राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे. आज देखील राजसत्ता धर्मसत्तेला श्रेष्ठ मानते. मनुष्य जीवन हे क्षणभंगुर आहे, ह्या देहातुन आत्मा केव्हांही जावू शकतो. त्यासाठी मनुष्यदेह ही एक संधी मिळालेली असून त्यामध्ये दानधर्म सत्कार्य, तीर्थयात्रा, गाथा ,भागवत ,ज्ञानेश्वरी, हरिपाठ अशा ग्रंथाचे चिंतन करून आपला उद्धार करावा. मिळालेल्या मनुष्य देहामध्ये संधीचे सोने करून घ्यावे”

बहुत दिस होती मज आज या उक्तिप्रमाणे आप्पांचा एक ध्यास होता. नाशिक त्र्यंबकेश्वराचा मोठा सप्ताह तुकोबारायाच्या दरबारात भंडारा डोंगरावर व्हावा आणि नाशिकच्या भाविकांना आमच्या कराळे कुटुंबाने अन्नदान करावे ही आप्पांची इच्छा आज पूर्ण होत आहे. हे कार्य भागवताचार्य एकनाथ महाराज गोळेसरांच्या माध्यमातून कराळे परिवारांचा आप्पांचा सर्व संकल्प सिद्धिस गेला. या पुढेही अव्याहतपणे सेवा करण्याची कराळे पाटील परिवाराने ग्वाही दिली.

आभार रामभाऊ कराळे पाटील यांनी मानले सूत्रसंचालन शांताराम कराळे पाटील यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.