BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पाच हजारांची लाच स्वीकारताना उपनिबंधकास पकडले

एमपीसी न्यूज- माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना एका उपनिबंधकास रंगेहाथ पकडण्यात आले. शिवाजीनगर येथील साखर संकुल इमारतीमध्ये पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. 27) ही कारवाई केली.

उमेश हरिश्‍चंद्र बेंढारी (वय 46, रा. वडगाव शेरी) असे लाच स्वीकारणाऱ्या उपनिबंधकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार यांनी माहिती अधिकारात सहकारी संस्थेची माहिती मागवली होती. त्या माहितीची कागदपत्रे देण्यासाठी बंधारी यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये उपनिबंधक बेंढारी हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले.

शनिवारी शिवाजीनगर येथील साखर संकुल इमारतीमध्ये सापळा रचून तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बेंढारी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनशाम बळप, पोलिस हवालदार दिपक टिळेकर, श्रीकृष्ण कुंभार आणि प्रशांत वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बेंढारी यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3