Pimpri : डॉ. नरेंद्र वैद्य यांनी केल्या गुडघा सांधेरोपणाच्या एकाच दिवशी 52 शस्त्रक्रिया

“इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

एमपीसी न्यूज- एकाच दिवशी गुडघा सांधेरोपणाच्या 52 शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम लोकमान्य रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अस्थिशल्य चिकित्सक डॉ.नरेंद्र वैद्य यांनी केला आहे. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

देशात गुडघेदुखीमुळे त्रस्त लोकांचे प्रमाण खूप आहे. सांध्यांमध्ये झीज होऊन गुडघेदुखीचा विकार बळावतो. झीज मोठी असल्यास सांधेरोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय ठरतो. गुडघेदुखीबद्दल जनजागृती नसल्यामुळे या दुखण्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. शिवाय या शस्त्रक्रियेचा खर्च परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात.

जास्तीतजास्त रुग्णांना त्याचा लाभ व्हावा त्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विक्रमाबद्दल डॉ. वैद्य म्हणाले, “अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा फायदा अत्यल्प खर्चात उपलब्ध करून दिला जातो. आधुनिक यंत्रसामग्री, सुविधा आणि त्यांच्या जोडीला नियोजन, यामुळे हा विक्रम करता आला. या प्रकारच्या एका शस्त्रक्रियेसाठी लागणारा वेळही सुमारे 20 ते 22 मिनिटांचा असल्याने हे शक्‍य झाले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.