Chinchwad : मतदान करा व मिळवा लाडाच्या कुल्फीवर पाच रुपये सूट

एमपीसी न्यूज- मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नामी कल्पना शोधून काढल्या जातात. कुणी हॉटेल मालक एकावर एक मिसळ फुकट देतो तर कुणी फुकट चहा पाजतो. आता सुप्रसिद्ध लाडाच्या कुल्फीवर सुद्धा पाच रुपये सूट जाहीर करण्यात आली आहे. पण त्याआधी तुम्हाला करायचे आहे मतदान !

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आयोगाकडून जनजागृती केली जाते. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पिंपरी-चिंचवडमधील लाडाच्या कुल्फीने स्वयंप्रेरणेने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी एक फंडा शोधला आहे. निवडणूक मतदान करा, मतदान केल्याची शाईची निशाणी दाखवा व कुल्फीमध्ये पाच रुपये सूट मिळवा अशी ऑफर देण्यात आली आहे.

‘पिंपरी-चिंचवडकरांनो यंदा मतदान कराल तर बोटावरची शाई जपून ठेवा. कारण बोटावरच्या शाईमुळे तुम्हाला स्वस्तात मस्त कुल्फी खायला मिळू शकेल’ असे आवाहन लाडाच्या कुल्फीचे मालक राहूल पापळ यांनी केले आहे. प्रत्येकानं मतदान केलं तर लोकांच्या पसंतीचा उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडला जाईल असे त्यांनी सांगितले. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी एका कुल्फीवाल्याने स्वयंस्फुर्तीने सुरू केलेला हा फंडा कौतुकास्पद आहे. मॅंगो, गुलकंद, चॉकलेट, शुगरफ्री, रेड पेरु, चिक्कू, सिताफळ अशा विविध फ्लेवरमध्ये ही कुल्फी उपलब्ध आहे. देशप्रेमाबरोबरच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याचा फंडा किती उपयोगी ठरतो ते उद्या मतदानाच्या दिवशी कळेलच

या ठिकाणी मिळेल 5 रुपये सूट

एचडीएफसी कॉलनी, शाहूनगर चिंचवड, डायगॉनन मॉलसमोर राजे शिवाजीनगर चिखली, शिवरोड जाधववाडी, काकडेपार्क चिंचवड, चिंतामणी चौकाजवळ संकल्प चौक वाल्हेकरवाडी, भूमकर चौक वाकड या ठिकाणी कुल्फीवर पाच रुपये सूट मिळणार असल्याची माहिती समाधान पाटील यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.