Pune: ‘बिझनेस बियॉन्ड इंडस्ट्री ४.०’ विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या वतीने आयोजित ‘बिझनेस बियॉन्ड इंडस्ट्री ४.०’ विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज (२९ फेब्रुवारी) हॉटेल अरोरा टॉवर्स येथे झाले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मर्सिडीझ बेंझ कंपनीचे सरव्यवस्थापक डॉ. उमेश देशपांडे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार अध्यक्षस्थानी होते.
अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे संचालक डॉ. आर. गनेसन यांनी स्वागत केले. चेकमेट २०२० या नावाने होणाऱ्या या परिषदेचे हे १२ वे वर्ष होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार, उद्योग आणि शैक्षणिक जगतातील मान्यवर, व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक या परिषदेला उपस्थित होते. ३० संशोधकानी आपले निबंध सादर केले.
महिला सक्षमीकरण क्षेत्रातील डॉ. मीरा वेंकट आणि ग्रामविकास, रोजगार निर्मिती क्षेत्रातील टाटा ट्रस्टस च्या विकासान्वेष फाउंडेशन चे वरिष्ठ सल्लागार डॉ. अजित कानिटकर यांचा सन्मान या परिषदेत मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. उमेश देशपांडे म्हणाले,’ चौथ्या औद्योगिक क्रांतीतील डाटा क्रांतीमुळे प्रत्येकाची क्षमता वाढली आहे. तशी उद्योगांची क्षमताही वाढली आहे. मात्र, ग्राहकांचे समाधान करण्याबाबत कोणतीही तडजोड उद्योगांना करता येणार नाही. ‘
डॉ. अजित कानिटकर म्हणाले, ‘प्रत्येकाने ग्राहक बनण्याऐवजी जबाबदार नागरिक बनले पाहिजे. मागे पडलेल्यांना मदतीचा हात देणे, हे या जबाबदारीचे प्रमुख लक्षण आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, जग झपाट्याने बदलत असताना नवी पिढी जबाबदारीने सज्ज करणे, ही शिक्षणक्षेत्राची जबाबदारी आहे.
डॉ.आर. गणेसन यांनी प्रास्ताविक केले. सदाफ करीम यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा कोटाळकर यांनी आभार मानले.