Mulshi : संगीता खोजे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शंतनू श्रीकांत खोजे शिक्षण संस्थेच्या संस्थापिका संगीता श्रीकांत खोजे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 2020-21 या वर्षाच्या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

संगीता खोजे यांनी 2008 मध्ये 7 मुलांच्या प्रेवेशा बरोबर द न्यू डेल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची घोटावडे या गावातून सुरुवात केली. अनेक अडचणींवर मात करत, कुणाच्याही मदतीशिवाय  खोजे यांनी ग्रामीण भागातील मुलांना ज्ञानदानाचे काम सुरु ठेवले आहे. आज शाळेची स्वत:च्या मालकीची सुसज्ज इमारत असून त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 

यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष रविराज साबळे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शरत शेट्टी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र राज्य सदस्य विशाल डांगे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ पुणे जिल्हा महिला अध्यक्ष वृषाली चव्हाण तसेच निहारीका घुले, गणेश पुंडे, नजीर पटेल, तुषार कापरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी रविराज साबळे, वृषाली चव्हाण, संगीता खोजे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. द न्यू डेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपप्राचार्या रॅाय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.