Pimpri: शहरातील पाणीपुरवठा आज, उद्या विस्कळीत

एमपीसी न्यूज –  रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा विद्युत पुरवठा काल (शुक्रवारी) व आज (शनिवारी) खंडित झाल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे आज सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून संध्याकाळचा आणि उद्याचाही (रविवार) पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्राचा काल शुक्रवारी आणि आज शनिवारी सकाळी विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्या कालावधीत पाण्याचा उपसा झाला नाही. परिणामी, पिंपरी-चिंचवड शहरातील आज सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच आज संध्याकाळचा आणि  उद्याचाही पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.