Prabhas New Movie : ‘बाहुबली’ फेम प्रभासचा लवकरच येणार नवा चित्रपट
'Baahubali' fame Prabhas' new film coming soon टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘प्रभास २०’ या हॅशटॅगने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
एमपीसी न्यूज – ‘महिष्मतीच्या बाहुबली’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा पटकावली. आजही ‘बाहुबली’ बघताना लहानथोर सगळेच रमून जातात. या चित्रपटाने प्रभास या गुणी अभिनेत्याला ओळख मिळाली. त्यानंतर त्याने बहुचर्चित ‘साहो’ या चित्रपटात काम केले. पण त्याला विशेष मान्यता मिळाली नाही. आता लवकरच अभिनेता प्रभास नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या या नव्या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली आहे.
प्रभासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत याविषयीची माहिती दिली. टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘प्रभास २०’ या हॅशटॅगने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. येत्या १० जुलै रोजी या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राधा कृष्ण कुमार हे तेलगू दिग्दर्शक या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तेलगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.
मोजकेच चित्रपट करणा-या प्रभासच्या आगामी चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये कुतुहल असते. त्यात आता टी-सीरिजसारख्या मोठ्या निर्मिती कंपनीसोबत प्रभासचा आगामी चित्रपट येतोय. त्यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे.
ARE YOU READY?… Title *and* first look of #Prabhas20 will be out on 10 July 2020 at 10 am… Stars #Prabhas and #PoojaHegde… Directed by Radha Krishna Kumar… In #Hindi, #Telugu, #Tamil and #Malayalam. pic.twitter.com/vUX6JXBMej
— taran adarsh (@taran_adarsh) July 8, 2020