Pune Crime News : मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिषाने आर्थिक फसवणूक, पतीपत्नीविरोधात गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी पुण्यातील एका दाम्पत्यावर जात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुरेश शांताराम बागुल (वय 45) यांनी फिर्याद दिली असून अमृत शैलेश औटी व शैलेश रमेश औटी या दोघा पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीच्या मुलाला आणि नातेवाईकांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादी कडून वेळोवेळी 1 लाख 85 हजार रुपये घेतले. परंतु नोकरी न लावता फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीने टाळाटाळ करून पैसे परत दिले नाहीत. यानंतर फिर्याद तिने पोलिसात तक्रार दिली. कोथरूड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.