Maharashtra Corona Update : राज्यात आज 12,182 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज – राज्यात आजही नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात आज 12 हजार 182 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात 9 हजार 927 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली.
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 लाख 38 हजार 398 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 89 हजार 294 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात सध्या 95 हजार 322 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra reports 9,927 new #COVID19 cases, 12,182 discharges and 56 deaths in the last 24 hours.
Total cases 22,38,398
Total recoveries 20,89,294
Death toll 52,556
Active cases 95,322 pic.twitter.com/P69iu3yY2P— ANI (@ANI) March 9, 2021
राज्यात आज दिवसभरात 56 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर 52 हजार 556 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.35 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.34 टक्के झाले आहे.
आजपर्यंत राज्यात 1 कोटी 70 लाख 22 हजार 315 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 22 लाख 38 हजार 398 सकारात्मक आले आहेत. राज्यात 4 लाख 57 हजार 962 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 827 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.