Pune Crime News : सराईत वाहन चोराला अटक ; पाच मोपेड जप्त
एमपीसी न्यूज : सराईत वाहन चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या जवळून पाऊणे दोन लाख रुपये किंमतीच्या पाच मोपेड जप्त करण्यात आल्या आहेत. खडक पोलिसांनी ही कारवाई केली.
अभिषेक उर्फ पप्पू शरद पवार (वय 33, रा. गुरुवार पेठ, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हा सराईत वाहन चोर आहे. तो वाहन चोरुन सिंहगड चौक, घोरपडे या ठिकाणी थांबला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने पाच चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या जवळून पाऊणे दोन लाख रुपये किंमतीच्या पाच मोपेड जप्त करण्यात आल्या आहेत.