Akurdi Crime News : किरकोळ भांडणात चावा घेत पाडला बोटाचा तुकडा
एमपीसी न्यूज – रस्सी तोडल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तिघांनी एकास मारहाण केली. तसेच चावा घेत बोटाचा तुकडा पाडला. ही घटना आकुर्डी येथे मंगळवारी (दि. 6) सायंकाळी घडली.
मूलचंद रामजीत यादव (वय 39 रा. दत्तवाडी, आकुर्डी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 7) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवन पांडुरंग देशमुख (वय 20), पांडुरंग देशमुख (वय 50), महिला आरोपी (वय 45 तिघेही रा. मराठे चाळ, दत्तवाडी, आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दत्तवाडी आकुर्डी येथे फिर्यादी यादव हे पिठाच्या गिरणीत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. रस्सी तोडण्याच्या कारणावरून आरोपी पवन याने फिर्यादीच्या कॉलरला धरून गिरणीच्या बाहेर ओढले.
आरोपी पवन आणि पांडुरंग यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यादव यांनी त्यास विरोध केला असता आरोपी पवन याने फिर्यादी यादव यांच्या बोटाचा जोरदार चावा घेत बोटाच्या पुढील भागाचा तुकडा पाडला.
निगडी पोलीस तपास करीत आहेत.