Vadgaon Maval : दिग्विजय कॉलनी येथे 44 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
एमपीसी न्यूज – दिग्विजय कॉलनी, वडगाव येथे भाजप नगरसेविका सुनीता भिलारे यांच्या प्रयत्नांमधून विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला आहे.
अंतर्गत बंदिस्त गटार आणि रस्ते काँक्रीटीकरण यासाठी 44 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते, शहर भाजपचे अध्यक्ष किरण भिलारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी मावळ तालुका भाजप प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, खंडू भिलारे, वडगाव शहर भाजयुमो सरचिटणीस शंकर भोंडवे, विनायक भेगडे, गजानन भेगडे, गणेश भिलारे, सागर मारकट, सूर्यकांत भिलारे, बिराजी ठोंबरे, दशरथ आलम, बाळासाहेब ठोंबरे, सारिका भिलारे, सुरेखा भिलारे, शांताबाई नायर, शांताबाई भिलारे आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.