Pimpri News: पालिकेचा ऑन द स्पॉट लसीकरणावर भर! मंगळवारी ‘या’ केंद्रांवर ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने जास्तीत-जास्त नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने 10 आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या 50 लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.
या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस!
हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, नवीन भोसरी रुग्णालय, महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरू शाळा च-होली, सखुबाई गार्डन भोसरी, गंगोत्री पार्क दिघी, नेहरुनगर उर्दु शाळा, क्लालिटी सर्कल भोसरी, मारुती गेणू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, कन्या शाळा चिखली, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव, महापालिका शाळा रहाटणी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख इंगोले शाळा, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, भानसे स्कूल यमुनानगर, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, तळवडे समाज मंदिर शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, ठाकरे शाळा रूपीनगर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, प्रेमलोक पार्क दवाखाना, दिनदयाल शाळा पवना बँक मागे संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, गणेश इंग्लिश स्कूल दापोडी आणि कासारवाडी दवाखाना या 46 केंद्रांवर कोविन अॅपवरुन बुकिंग केलेल्या 10 लाभार्थी, किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेले 50 आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे 200 नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणीसाठी सकाळी 8 नंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत.
ऑनदस्पॉट, ऑनलाइन बुकिंग पद्धतीने या 9 ठिकाणी ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार!
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, निळु फुले नाट्यगृह पिंपळेगुरव आणि आचार्य अत्रे सभागृह या नऊ ठिकाणी कोविन अॅपवरुन बुकिंग केलेल्या 10 आणि 290 लाभार्थ्यांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
या 9 ठिकाणी मिळणार ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस!
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव आणि आचार्य अत्रे सभागृह या नऊ ठिकाणी 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस!
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.