Talegaon News : स्तनाचा कर्करोग तपासणी व मार्गदर्शन शिबिर: इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे यांचा उपक्रम
एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हिल क्लब तळेगाव दाभाडे तर्फे स्तनाचा कर्करोग तपासणी व मार्गदर्शनपर मोफत शिबीर घेण्यात आले. हे शिबीर ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय, भाटिया काॅलनी , वतननगर तळेगाव दाभाडे येथे पार पडले.
इनरव्हिल क्लब तळेगाव दाभाडे च्या अध्यक्षा काजल गारोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सर्व महिलांचा पुष्प व योगामृत देऊन महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. डॉ. राणी बच्चे (स्त्रीरोगतज्ञ ), डॉ. निता मुरूगकर व डॉ . लता पुणे यांनी स्तनाचा कर्करोग निदान या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. राधिका हेरेकर व डॉ. साक्षी राशिनकर व सर्व डॉक्टर्सनी महिलांची तपासणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पिंपळखरे यांनी केले, तर आभार सचिव संध्या थोरात यांनी मानले. कार्यक्रमास क्लबच्या उपाध्यक्ष वैशाली दाभाडे, माजी अध्यक्ष प्रवीण साठे , माजी अध्यक्ष निता काळोखे, कल्पना खोत व इतर उपस्थित होते.