Pune Crime News : खळबळजनक! राष्ट्रपती पदकासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर, पुणे पोलीस दलातील हवालदारासह चौघांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या पुणे पोलीस दलातील प्रसिद्ध पोलीस हवालदाराने राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पोलीस दलाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2017 ते 2020 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.

पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (नेमणूक विशेष शाखा, पुणे शहर), नितेश अरविंद आयनूर ( पोलीस उपायुक्त कार्यालय गोपनीय शाखेतील कनिष्ठ लिपिक), रवींद्र धोंडीबा बांदल (वरिष्ठ लिपिक) आणि गणेश जगतापच्या अज्ञात सहकाऱ्याविरोधात भादवी 409, 420, 467, 468, 475, 476, 474, 472, 471, 466, 167 व 120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ लिपिक संतोष प्रतापराव भोसले यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 11 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार गणेश जगताप हा सध्या विशेष शाखेत नेमणूकीस आहे. 2017 ते 2020 या कालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना त्याने हा सर्व प्रकार केला. स्वतःच्या फायद्यासाठी व राष्ट्रपती पोलीस पदक मिळवण्यासाठी गुन्हेगारी कट करून व शासनाची फसवणूक करण्यासाठी सेवापुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण करून खोटा दस्त तयार केला होता. त्यावर बनावट सह्या करून सरकारी शिक्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी त्याला दोन वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा झाली होती.

काऊंटडाऊन दहावी! भाग 10 – Tricks to score higher in SSC English Exam – Santosh Khatal. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान गणेश जगताप याने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने शिक्षा झाल्याचे दस्तऐवज व रेकॉर्ड नष्ट करून स्वतःचा बेकायदेशीर फायदा करून घेतला आहे. त्यामुळे वानवडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शेकडो पुरस्काराने सन्मानित व बहुप्रसिद्ध असलेल्या पोलीस हवालदाराने राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक केंजळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.