Kranti din: क्रांतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड साहित्यिकांच्या वतीने क्रांतीवीरांना अभिवादन

एमपीसी न्यूज: 9 ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांनी राजगुरुनगर येथील क्रांतीवीर राजगुरु,भगतसिंग आणि सुखदेव यांच्या स्मारकस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले.(Kranti din) भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे,मेजर गजानन सोनवणे यांनी सर्व पिंपरी-चिंचवडकर साहित्यिकांच्या वतीने हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.

ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी माहिती दिली. ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, सुरेश कंक, प्रा. राजेंद्र सोनवणे, नितीन हिरवे यांच्यासह शहरातील वेगवेगळ्या साहित्य संस्थांचे सुमारे तीस प्रतिनिधी उपस्थित होते.(Kranti din) कवी मधुकर गिलबिले हे हुतात्मा स्मारकाची उभारणी केल्यापासून आजतागायत नित्यनेमाने देखभाल करतात. याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत साहित्यिकांना तिरंगा प्रदान करण्यात आला. यावेळी भर पावसात उपस्थित ‘भारतमाता’ आणि ‘वंदेमातरम’चा जयघोष केला.

kranti din

Solid waste management : ‘नॉर्वे’तील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास घनकचरा व्यवस्थापनास मदत होईल – जनरल अर्न जान फ्लोलो

राष्ट्रगीताने अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर श्रावणमास आणि आदिवासी दिनाचेही औचित्य साधून साहित्यिकांनी  भिमाशंकर परिसरात वर्षाविहाराचा आनंद कविसंमेलनाच्या माध्यमातून द्विगुणित केला. देशभक्ती, निसर्ग, पर्यावरण, प्रेम, पाऊस आणि सामाजिक जाणीव या विषयांवर वैविध्यपूर्ण सादरीकरण केले.

यात प्रकाश घोरपडे,दैवता घोरपडे, निशिकांत गुमास्ते,जयश्री गुमास्ते, शीला जगदाळे,शामराव सरकाळे,अशोकमहाराज गोरे,तानाजी एकोंडे,सरोजा एकोंडे, रघुनाथ पाटील, नंदकुमार मुरडे,संध्या गांधलीकर,उज्वला भैरट,नीता हिरवे,शोभाताई जोशी,फुलवती जगताप,सविता इंगळे,भावना क्षीरसागर,प्रकाश निर्मळ,वर्षा बालगोपाल, शामला पंडित, दत्तू ठोकळे,पुष्पा देशपांडे, योगिता कोठेकर इ. वर्षाविहार सहलीत सहभागं घेतला.(Kranti din) यावेळी अण्णा जोगदंड,कवी वादळकार, मुरलीधर दळवी, अशोक गोरे,हेमंत जोशी, सुभाष चव्हाण यांनी पुढाकार घेऊन मंचर परिसरात वृक्षारोपण केले. तानाजी एकोंडे, कैलास भैरट, सविता इंगळे, नारायण कुंभार, प्रकाश घोरपडे, वर्षा बालगोपाल यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत जोशी यांनी आभार मानले. कवी सुरेश कंक व कवी वादळकार ,पुणे यांच्या मार्गदर्शनाने हा स्वातंञ्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा स्तुत्य उपक्रम यशस्वी झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.