Khadakwasla dam Update : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 6848 क्यूसेक्स विसर्ग सुरू
एमपीसी न्यूज : खडकवासला धरणाच्या ( Khadakwasla dam Update) सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सायंकाळी 6 वाजता 6848 क्यूसेक करण्यात आला आहे. असे यो.स.भंडलकर (सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प) यांनी सांगितले आहे.
आज पहाटे 2 पासून 1,929 क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवून सकाळी 11 वाजता 3424 क्यूसेक करण्यात आला होता. पावसाचा जोर वाढल्याने तो वाढवून दुपारी 1 वाजता 4280 क्यूसेक करण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता 5136 क्यूसेक करण्यात आला. 5 वाजता 5136 क्यूसेक करण्यात आला होता. पावसाचा जोर खूपच वाढल्याने सायंकाळी 6 वाजता 6848 क्यूसेक करण्यात आला आहे.
Rojgar Melawa : रोजगार भरती मेळाव्यात 803 उमेदवारांची निवड
पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त (Khadakwasla dam Update) करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. असेही त्यांनी सांगितले आहे.