MPC News Online Bappa : न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्सच्या वतीने पाच विजेत्यांना चांदीचे नाणे प्रदान
एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजच्या वतीने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या ऑनलाईन बाप्पा (MPC News Online Bappa) या घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील पाच विजेत्यांना स्पर्धेचे प्रायोजक न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्सच्या वतीने चांदीचे नाणे देऊन सन्मानीत करण्यात आले.
एमपीसी न्यूजने आयोजित केलेल्या या स्पर्धेस स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांची चांदीचे नाणे या बक्षिसासाठी निवड झाली आहे. त्यापैकी पाच विजेत्यांना छोटेखानी समारंभात पारितोषिक प्रदान करण्यात आले.
न्यू रुपलक्ष्मी ज्वेलर्सच्या भोसरी येथील शोरूममध्ये झालेल्या या कार्यक्रमास संचालक संजय उदावंत, कार्यकारी उपसंचालक संतोष उदावंत, सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच एमपीसी न्यूजचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे आदी उपस्थित होते.
या समारंभात पारितोषिक प्रदान करण्यात आलेल्या (MPC News Online Bappa) विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.