Today’s Horoscope 17 september 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 september 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – शनिवार

तारीख 17.9.22

शुभाशुभ विचार – चांगला दिवस

आज विशेष – कालाष्टमी

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30

दिशा शूल – पूर्वेस असेल

आजचे नक्षत्र – रोहिणी 12.21 पर्यंत नंतर मृग

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग – हिरवा)

आज तुमची मिळकत उत्तम असेल.गृहिणींना अचानक येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. फारच अर्जंट नसतील तर प्रवास टाळलेले बरे.विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करणार आहेत.

वृषभ – (शुभ रंग – सोनेरी)

कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरी पडेल.महत्त्वाचे निर्णय आज विचारांती घ्या.अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले महत्त्वाचे असतील.

मिथुन – (शुभ रंग – राखाडी)

मी पणा आज प्रगतीच्या आड येऊ शकतो.वाणीत गोडवा ठेवल्यास बरीच अवघड कामे सोपी होऊ शकतील.एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीने प्रवासास निघावे लागेल.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)

सर्वच दृष्टीने अनुकूल असलेला आजचा दिवस सत्कारणी लावा.आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.

सिंह – (शुभ रंग – निळा)

यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल.अति व्यस्त दिवस.

कन्या – (शुभ रंग- डाळिंबी)

आज कोणत्याही नवीन उपक्रमांची सुरुवात नको.घरात वडीलधारी मंडळींशी काही वादविवाद संभवतात.तुम्हाला आज जरा एकांताची गरज भासेल.ज्येष्ठ मंडळींची पावले सत्संगाकडे वळतील.

तूळ – (शुभ रंग- आकाशी)

आपल्या कार्यक्षेत्रात सम व्यवसायिकांना कमजोर समजू नका.नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करायला हवी.हितशत्रू टपूनच बसलेले आहेत सतर्क रहा.

वृश्चिक – (शुभ रंग – मरून)

व्यवसायात भागीदारांशी एकमत असेल.त्वरित घेतलेले महत्वाचे निर्णय योग्य ठरतील.वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील.आशादायी दिवस.

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या उचापती चालूच राहणार आहेत.आरोग्य विषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे.दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.स्पर्धेत विजय नक्की.

मकर – (शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असेल तर चांगल्या संधी  उपलब्ध होतील.नवोदित कलाकारांच्या अथक परिश्रमांना यश येईल.रुग्ण ठणठणीत बरे होतील.सहकुटुंब मौजमजा.

कुंभ – (शुभ रंग – मोरपंखी)

जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील.विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयातही गोडी निर्माण होऊ शकेल.गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

मीन – (शुभ रंग – भगवा)

आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.