Today’s Horoscope 5 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य
एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 5 October 2022
वार – बुधवार.
तारीख 05-10-2022
शुभाशुभ विचार- शुभ दिवस.
आज विशेष – विजयादशमी दसरा.
राहू काळ – दुपारी 12 ते 1.30
दिशा शूल- उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- श्रवण 21.15 पर्यंत नंतर धनिष्ठा.
चंद्र राशी- मकर.
आजचे राशिभविष्य
मेष – शुभ रंग- आकाशी
नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात आज अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल.
वृषभ- शुभ रंग- पांढरा
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज विरोधी दिवस असून नोकरदारांना साहेबांचे मूळ सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागेल.
मिथुन- शुभ रंग- निळा
आज फक्त आपल्याच स्वार्थाचा विचार करा भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊन अडकू नका. वैवाहिक जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. वाहन काळजीपूर्वक चालवा.
कर्क- शुभ रंग- निळा
आज वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण असेल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात आज जोडीदाराचे मत आवश्यक करताना कायद्याच्या चौकटीत राहा. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.
सिंह -शुभ रंग- भगवा
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले उचलणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.
कन्या- शुभ रंग- क्रीम
आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. नवोदित कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.
तूळ- शुभरंग- स्ट्रॉबेरी
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता होईल. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
वृश्चिक- शुभ रंग- मोतिया
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी वणवण भटकावे लागेल. रिकामडीकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल घराबाहेर वाद टाळा. व्यसनांपासून लांब राहा.
धनु- शुभ रंग- गुलाबी
आज तुमचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहजच उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पडतील आनंदी दिवस.
मकर- शुभरंग- क्रीम
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना मनपसंत स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च करू शकाल. इतरांच्या भानगडीत मध्यस्थी करावी लागेल.
कुंभ- शुभरंग- राखाडी
खर्चाचे प्रमाण किती वाढले तरी पैसा कमी पडणार नाही कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.
मीन- शुभरंग- पिस्ता
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. तुमचे कष्ट कारणी लागतील. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. दिवसाचा उत्तरार्धात लाभ होईल.
शुभम भवतु
श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424