Khed: वासुली येथे सोनाराच्या दुकानात चोरी
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील वासुली येथील सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून 62 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत.ही घटना रविवार (दि.10) ते सोमवार (दि.11) घडली.
याप्रकरणी राजेंद्र मुंढलिक (वय 52 रा.निगडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Khed : लहानांमुळे मोठ्यांमध्ये जुंपली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वासोली येथे गुरुमुर्ती ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. फिर्यादी रविवारी सायंकाळी त्यांचे दुकान बंद करुन गेले असतान चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील 59 हजार 161 रुपयांचे चांदिचे दागिने व 3 हजार 315 रुपयांचे सोन्याचे दागिने असे एकूण 62 हजार 476 रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.