PMPML : श्री तुकाई देवी यात्रेनिमित्त नियमित पाच बससह दोन ज्यादा बसचे नियोजन

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) कडून कोंढणपूर येथील श्री तुकाई देवी यात्रा निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी ज्यादा बस सोडण्यात येणार आहेत. मार्ग क्रमांक 292 – कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर या मार्गावर 13 डिसेंबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आठवड्यातील दर रविवार मंगळवार शुक्रवार या दिवशी दोन ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

सध्या कात्रज सरपोद्यान बस स्थानक ते पंढरपूर या मार्गावर पीएमपीएमएलच्या दररोज नियमित 5 बसेस दर 30 मिनिटांच्या वारंवारीतेने सुरु असून दिवसभरात एकूण 58 फेऱ्या होतात. या पाच बसेस व्यतिरिक्त दोन ज्यादा बसेसचे नियोजन 13 डिसेंबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी करण्यात आले आहे. या दोन ज्यादा बसेस भाविकांच्या गर्दीनुसार व आवश्यकतेनुसार धावतील.

Pimpri : तरुणाचा रुद्र आवतार पाहून लुटेरे त्यांचीच गाडी सोडून झाले पसार

तसेच पुणे- सातारा रोडवर कात्रज सर्पोद्यान ते सारोळा (दररोज पाच बसेस), मार्ग क्रमांक 293-  कात्रज  सर्पोद्यान ते सासवड – मार्गे कापूरहोळ (दररोज दोन बसेस), मार्ग क्रमांक 296 कात्रज सर्पोद्यान ते विंझर (दररोज तीन बसेस) व मार्ग क्रमांक 296अ – कात्रज सर्पोद्यान ते वांगणी वाडी (दररोज एक बस) या मार्गावर संचलनात असणाऱ्या बसेस कोंढणपूर फाट्या पर्यंत जाण्यासाठी उपलब्ध आहेत.

तरी कोंढणपूर येथील (PMPML)श्री तुकाई देवी दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.