Khed : लहानांमुळे मोठ्यांमध्ये जुंपली

एमपीसी न्यूज – लहान मुलांच्या कारणावरून (Khed)मोठ्यांनीच आपापसात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथे रविवारी (दि.10) रात्री घडला.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी महादेव जगन्नाथ देवडे, दोन महिला आरोपी, ओमकार विक्रम नवले व ओमकार याचा मित्र उद्धव (सर्व रा.आळंदी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : तरुणाचा रुद्र आवतार पाहून लुटेरे त्यांचीच गाडी सोडून झाले पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या (Khed) कारणावरून आरोपींनी जमाव जमवून फिर्यादी व त्यांचे पती यांना लाकडी बॅट व लाकडी काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले आहे. तसेच, शिवीगाळ करत दमदाटी केली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.