Pimpri news: अखिल भारतीय सिंधी समाज ट्रस्ट च्या वतीने क्रांतीवीर हेमु कलानी यांना आदरांजली

एमपीसी न्यूज- पिंपरी येथील हेमु कलानी उद्यानात क्रांतीवीर हेमु कलानी यांच्या 80 व्या पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय सिंधी समाज ट्रस्ट च्या वतीने क्रांतीवीर हेमु कलानी (Pimpri news)यांना आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन काल शनिवार (21 जानेवारी )सकाळी 8 वा करण्यात आले होते.
हेमु कलानी यांनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि ब्रिटीशांचे अधिकारी प्रवास करीत असलेल्या रेल्वेला रेल्वे रूळ उखडले परंतु त्याच वेळी एका कर्मचाऱ्याने त्यांना पकडून देण्यास मदत केली. त्या मुळे कोर्टाने त्यांना माफी मागावी असा आदेश दिला, पण तो आदेश हेमु कलानी यांनी फेटाळून लावत भारताच्या स्वातंत्र्यासाठी फाशी जरी झाली तरी मी परत जन्म घेऊन स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न करेन असे कोर्टाला ठाम पणे सांगितले.

त्या मुळे कोर्टाने त्यांना 21 जानेवारी 1943 साली फाशी दिली.त्यामुळे हा दिवस संपूर्ण सिंधी समाजा (Pimpri news)कडून शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवनदास पमनानी आणि अँड सुशील बजाज यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आज पिंपरी येथील  शिवनदास पमनानी, राजु आसवानी, महेश मोटवानी, मनोहर जेठवानी, किरण रामनानी, अजित कंजवानी,कमल मलकानी, कैलास बजाज, हिरा रिजवानी, मनोज पंजाबी, सुरिंदर मघंनानी, सुशिल बजाज, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.