Pune News : पुणे पोलीस शिपाई भरतीच्या पुढील चाचणीचे वेळापत्रक संकेत स्थळावर जाहीर
एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस चालक भरती- 2021 च्या कौशल्य चाचणीसाठी संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पोलिस शिपाई चालक पदाच्या मैदानी चाचणीमध्ये 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण (Pune News) झालेल्या उमेदवारांपैकी रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणात वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या 870 उमेदवारांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Chinchwad News : ठाकरे गटाच्या महिला संघटिकेसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी मागे
पुणे शहर पोलिसांच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या तारखेला (Pune News) पहाटे साडे पाच वाजता सीओईपी शिवाजीनगर या ठिकाणी वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.