Dehuroad : बोडकेवाडी बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – देहूगाव जवळील बोडकेवाडी बंधाऱ्यात बुडून एका (Dehuroad)तरुणाचा मृत्यू झाला. रुपीनगर तळवडे येथील काही तरुण बंधाऱ्यात पोहण्यासाठी आले असता पोहताना तरुण पाण्यात बुडाला. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी घडली.

अक्षय राजू वाघमारे (वय 18, रा. रुपीनगर, तळवडे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अक्षय वाघमारे आणि त्याचे मित्र गौरव उत्तम शिरसाट (वय 16), यश आनंद लोंढे (वय 14), वेदांत दीपक वाघमारे (वय 12), जेद शेख, सोन्या वाघमारे हे सर्व गुरुवारी दुपारी बोडकेवाडी येथील इंद्रायणी नदीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले. बंधाऱ्यात पोहत असताना अक्षय वाघमारे हा पाण्यात बुडाला.

Pune : मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

 पीएमआरडीए, हिंजवडी, पिंपरी चिंचवड महापालिका, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ व वन्यजीव रक्षक मावळ या संस्थांचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. बंधाऱ्यातील पाण्यात शोध घेऊन गुरुवारी रात्री नऊ (Dehuroad)वाजताच्या सुमारास अक्षयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

निलेश संपतराव गराडे, शुभम काकडे, विनय सावंत, अनिश गराडे, साहील ढमाले, अमित टिळेकर, अवदुत लांघे, अविनाश कार्ले, विकी दौंडकर, भास्कर माळी या स्वयंसेवकांनी मृतदेह शोधण्याचे काम केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.