Lonavala : नॅशनल युथ चॅम्पियनशिपमध्ये शिवदुर्गच्या आदित्य पिलानेला कांस्य पदक
एमपीसी न्यूज – बेंगलोर येथे शनिवारी (दि. 12) नॅशनल युथ चॅम्पियनशिप या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शिवदुर्ग क्लायम्बिंगच्या आदित्य शंकर पिलाने याला कांस्य पदक मिळाले. या कामगिरीमुळे त्याची 19 नोव्हेंबर रोजी चीन येथे होणाऱ्या एशियन युथ चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.
Shirgaon : शिरगाव येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा
बेंगलोर येथे झालेल्या नॅशनल युथ चॅम्पियनशिप स्पर्धेत शिवदुर्ग क्लायम्बिंग टीमच्या तीन क्लायंबरनी सहभाग घेतला. 18-19 वयोगटात शिवदुर्गच्या आदित्य शंकर पिलाने याने चांगली कामगिरी करत कांस्य पदक मिळवले.
तीन महिन्यांनी 19 नोव्हेंबर रोजी चीन येथे एशियन युथ चॅम्पियनशिप ही स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इंडिया क्लायम्बिंग टीममध्ये आदित्यची निवड झाली आहे. शिवदुर्ग क्लायंबिंग टीमचा हा पहिला खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असल्याने त्याच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.