Shirgaon : शिरगाव येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – शिरगाव (Shirgaon) येथे सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 13) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

Pune : पुणे मेट्रोमध्ये भूमी पुत्रांना नोकर्‍या मिळाल्याच पाहिजे, ठाकरे गटाकडून पुण्यात आंदोलन

दया विनोद साळुंके (वय 25, रा. कंजारभाटवस्ती, शिरगाव, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शुभम राजगुरे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन भिजत घातले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून गेला. पोलिसांनी एक लाख 50 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.