Nigdi : स्वरसागर महोत्सवातील अभ्यासपूर्ण  आणि दिमाखदार नृत्य व गायनाच्या कार्यक्रमांना रसिकांची पसंतीची दाद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित रौप्य महोत्सवी स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाच्या दुस-या दिवशी म्हणजे रविवारी( 13 ऑगस्ट) सुरुवातीला( Nigdi) जलदिंडी प्रतिष्ठान आयोजित वसुंधरा बचाव हा समूह नृत्याचा  कार्यक्रम सादर करण्यात आला. पवना नदी सुधार आणि बचाव या संकल्पनेतून जलदिंडी प्रतिष्ठानचे काम सुरु आहे. पिंपरी चिंचवडची जीवनवाहिनी असलेली पवना नदी काळाच्या ओघात शहरात आल्यानंतर सध्या अत्यंत प्रदूषित झाली आहे.

तिच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी वाढता लोकसहभाग ही काळाची गरज आहे. त्यामुळे ‘रिव्हर पोलिसिंग’ ही एक अभिनव संकल्पना जलदिंडी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या निमित्ताने येथे मांडण्यात आली. या नृत्याच्या कार्यक्रमात सिटीप्राईड स्कूल, ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनी आणि ज्ञानप्रबोधिनी, निगडी शाळेच्या विद्यार्थिनींनी अत्यंत दिमाखदार आणि विचार करायला लावणारे नृत्याविष्कार सादर केले. वसुंधरा बचाव, जलसंवर्धन हा सध्याचा सर्वात प्राधान्यक्रमाचा नारा असला पाहिजे यावर त्यांनी अत्यंत उद्बोधक पद्धतीने नृत्य सादर केले.

दुस-या सत्रात नुपूर नृत्यालयाच्या डॉ. सुमेधा गाडेकर व त्यांच्या शिष्यांनी ‘तत्वम – कथक व त्यापलीकडे’ या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केले. सर्वप्रथम ( Nigdi)शिववंदना सादर केली. त्यानंतर गजझंपा तालावर थाट, आमद, तोडे, तुकडे यासह एकल नृत्य सादर केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अत्यंत नेत्रदीपक अशी नृत्यनाटिका सादर करण्यात आली.

Pune : पुणे मेट्रोमध्ये भूमी पुत्रांना नोकर्‍या मिळाल्याच पाहिजे, ठाकरे गटाकडून पुण्यात आंदोलन

मागील दोन वर्षे ज्या आपत्तीने सर्वांना त्रस्त केले त्या ‘करोना’ या विषयावर गतभाव सादर करण्यात आला. डॉ. सुमेधा गाडेकर या व्यवसायाने स्वत: वैद्यकीय व्यावसायिक असल्याने त्यांनी या गतभावातील भावदर्शन अत्यंत प्रभावीपणे सादर केले. पावसाचे गाणे सांगणारा चतरंग सादर करण्यात आला आणि ‘घेई छंद मकरंद’ या नाट्यगीतावर जोरकस नृत्य सादर करुन त्यांनी रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.

शेवटच्या सत्रात ‘ओ गानेवाली’ हा एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि  वेगळ्याच विषयावर आधारित संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळातील( Nigdi) तवायफ हा तसा चारचौघात उल्लेख न केला जाणारा विषय. पण या तवायफ, गणिकांनी एक वेगळ्या प्रकारचे संगीत जिवंत ठेवले. त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन आणि सादरीकरण ‘ओ गानेवाली’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवंती पटेल आणि ऋतुजा लाड दोन युवा कलाकारांनी अत्यंत संयतपणे आणि प्रभावीपणे पेश केले.

ठुमरी, दादरा, कजरी, होरी, गजल या संगीत प्रकाराच्या माध्यमातून या गानेवाल्यांचे जीवन त्यांनी अत्यंत प्रभावीपणे रसिकांसमोर सादर केले. बेगम अख्तर किंवा अख्तरीबाई, इक्बालबानू, निर्मलादेवी, विद्याधरीबाईजी, गौहरजान या सारख्या दिग्गज कलावतींच्या दुनियेची अभ्यासपूर्ण आणि रंजक सफर यानिमित्ताने अवंती आणि ऋतुजा यांनी घडवून आणली. भारतीय शास्त्रीय संगीताचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे प्रकार आहेत. त्यातील उपशास्त्रीय संगीत या सर्व कलावतींनी जिवंत ठेवले. त्याची अभ्यासपूर्ण सफर अत्यंत रंजक विवेचनातून कुठेही कंटाळवाणी न होता अत्यंत रंजकपणे पेश करण्यात आली.

Shirgaon : शिरगाव पोलिसांनी गोमांसाने भरलेली कार पकडली

या निवेदनाच्या जोडीला अवंती आणि ऋतुजा यांनी अत्यंत सुरेलपणे आणि प्रभावी अशा या तवायफांच्या विविध रचना सादर केल्या. ‘छा रही काली घटा’, ‘मैने लाखोंके बोल सहे’, ‘का करु ना माने रे सखी री’, ‘हो गयी बेलीया पिया के आवन की’ या विविध रचना अत्यंत सुरेलपणे आणि दिमाखदार पद्धतीने सादर केल्या. या दोघींनी यावेळी सादर केलेले अभ्यासपूर्ण विवेचन त्यांचा या विषयावर( Nigdi) किती सखोल अभ्यास आहे हे दाखवून देणारे होते. तो स्वातंत्र्यपूर्व काळ असल्याने विविध प्रकारची बंधने होती.

पण त्यावर मात करत या सर्व कलावतींनी आपली कला जिवंत ठेवली. त्याला राजाश्रयाबरोबर लोकाश्रय देखील मिळवून दिला. विद्याधरीबाईजींची एक अत्यंत वेधक रचना आहे, ‘चुन चुन के फूल ले लो, अरमान रह ना जाये, ये हिंद का बगीचा गुलजार रह ना जाये’. गौहरजान या त्यावेळच्या एक अत्यंत लोकप्रिय आणि धनाढ्य कलावतीची एक वेगळीच आठवण त्यांनी यावेळी रसिकांना सांगितली. त्याकाळी या कलावतीकडे घोड्याची बग्गी होती. पण इंग्रज साहेबाला कलावतीने त्याच्यासमोर घोड्याच्या बग्गीतून जाणे आवडले नाही.

त्याने तिची बग्गी जप्त करायला सांगितली. पण गौहरजानच ती, तिने दररोज हजार रुपये दंड भरुन बग्गीतून जाणे चालूच ठेवले. अशा अनेक रोचक किस्से, गीते यांच्या माध्यमातून अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रंजक बनलेल्या या कार्यक्रमाचा समारोप अवंती आणि ऋतुजा यांनी कजरी आणि होरी याच्या मेडलीने केला आणि रसिकांची टाळ्यांच्या कडकडाटाची पसंतीची पावती मिळवली. या दोघींना तितकीच  दमदार तबला साथ अक्षय जाधव यांनी संयत व अभ्यासपूर्ण संवादिनी साथ गोपाल प्रभू यांनी आणि नजाकतदार आणि सुरेल सारंगी साथ एजाज हुसेन यांनी केली. या कार्यक्रमाची संहिता गुरु अश्विनी भिडे देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवंती पटेल हिने लिहिली होती. तसेच निर्मिती कुशल खोत यांची होती.
या कलाकारांचे सत्कार पिंपरी चिंचवडचे प्रशासक शेखर सिंह व मुख्य संयोजक प्रवीण तुपे( Nigdi) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.