Nigdi : निगडीत ‘अँटनी ग्रुप प्रीमियर लीग’
एमपीसी न्यूज – अँटनी ग्रुप 18 ते 26 मार्च 2024 दरम्यान (Nigdi) “अँटनी ग्रुप प्रीमियर लीग 2024 या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर या स्पर्धा होत आहेत. पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ट्रॉफीजचे अनावरण करून स्पर्धेचा शुभारंभ झाला. कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, सहाय्यक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे, शांताराम माने, कुंडलिक दरवडे हे उपस्थित होते. या स्पर्धेत एजी एन्व्हायरोच्या कर्मचाऱ्यांचे 6 संघ व अँटनी लाराच्या कर्मचाऱ्यांचे 2 संघ अशा एकूण 8 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी होणार आहे. गिफ्ट कुपन्स, ट्रॉफीज, प्रमाणपत्रे इत्यादी प्रकारची *Nigdi) भरघोस बक्षिसे देखील कंपनीने जाहीर केली आहेत.
Khed : कोयाळी येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा
या कंपनीतर्फे महिला दिनाच्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पारंपरिक वेषभूषा, पारंपरिक नृत्य व होम मिनिस्टर असे कार्यक्रम आयोजित केले होते. ज्यात कंपनीच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.