Nigdi : जातीबाबत बोलल्याने जाब विचारणाऱ्यावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जाती बद्दल बोलणाऱ्याला (Nigdi) जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना 9 मार्च रोजी रुपीनगर येथे घडली.

वाहिद अल्लाबक्ष मुकरताल (वय 28, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिरोज आयुब खान, इम्रान आयुब खान, इम्तियाज अफजल खान, आलम कुरेशी (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : निगडीत ‘अँटनी ग्रुप प्रीमियर लीग’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मावस भाऊ रुपीनगर येथील एका हॉटेलमध्ये चहा पीत होते. त्यावेळी तिथे आरोपी देखील चहासाठी आले. त्यावेळी ते आपसात फिर्यादी यांच्या जातीबद्दल (Nigdi) बोलत होते. त्यामुळे फिर्यादी यांच्या मावस भावाने आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मावस भावाला मारहाण करून तोडून टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.