Pimpri: पिंपरी-चिंचवड शहरात ईद उत्साहात साजरी
चिंचवड परिसरात चिंचवडगाव-आलमगीर शाही मशीद, मौल्लाना मिनहाज (Pimpri)असरफी, मौल्लाना इनामुल हक, चिंचवड स्टेशन-मजीद ए अम्मार-हाफीज मौन्नूद्दीन, मोहननगर-मजीद ए हिदायतूल मुस्लमीन-हाफिज वसीम साहब, विद्यानगर-मजीद ए अक्सा-मौल्लाना इम्रान मोन्नुद्दीन साहब, आकुर्डी-मजीद ए मदिना-मुफ्ती अबीद साहब, आकुर्डी-मजीद ए अक्सा-मुफ्ती अब्दुल कादीर साहब, काळभोरनगर-मजीद ए फारूकीया-हाफीज लायक साहब, बिजलीनगर-मजीद ए नूरईलाई-मौल्लाना अब्दुल सकूर साहब, वाल्हेकरवाडी-मजीद ए बीसाल-मौल्लाना खुर्शीद साहब, चिंचवडेनगर-मजीद ए हुसैनी-मौल्लाना आखीब साहब, दळवीनगर-मजीद ए बीसाल-हाफीज जैन्नूद्दीन साहब, चिंचवडगाव-मजीद ए ईदगाह-मौल्लाना मिनाज साहब यांनी नमाज पठण केले.
अल्लाहाचा आज्ञेप्रमाणे शहरातील सर्व वयोगटातील मुस्लिम बांधव व महिलांनी 30 दिवसांचे उपवास त्यांच्या क्षमतेनुसार केले. दिवसभरात पाच वेळा नमाज पठण केले. दररोज संध्याकाळी रोजा इफ्तारी रोज (रोजा सोडण्याची) वेळ झाल्यानंतर सामुहीकरित्या करून तराबी नमाजमध्ये पवित्र कुराणचे पठण मुफ्ती मौल्लाना यांनी नमाज पढविला. चंद्रदर्शन झाल्यानंतर आज सकाळी मुस्लिम बांधव नवीन कपडे, पारंपारिक वेशभूषा परिधान करून रमजान ईदच्या नमाज पठण केले.
विविध ठिकाणी नमाज पठण सामुहीकरित्या पार पडल्या, त्यावेळी धर्मगुरु मुफ्ती, मौल्लाना, हाफिज साहब यांनी अल्लाहाची शिकवण आहे. सर्वांवर प्रेम करा, रमजान ईद सर्वांना आदर करण्यासाठी एकत्रित काम करण्याची प्रेरणा देण्याचा सण आहे.