Wakad : भूमकर चौकातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – हिंजवडी मध्ये चक्राकार वाहतूक आणि भूमकर चौकातील वाहतुकीत बदल करून हे बदल प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले. मागील काही दिवसांपासून भूमकर चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यात नागरिकांच्या हरकती आणि सूचना वेळोवेळी मागवण्यात येत आहेत.

नागरिकांच्या सूचना आणि हरकती यांचा विचार करत वाहतूक विभागाने भूमकर चौकातील वाहतुकीत काही प्रमाणात बदल केले आहेत. त्याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी काढले आहेत.

         भूमकर चौकात करण्यात आलेले बदल

# हिंजवडी गावातून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वाळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांनी सरळ जाऊन काळा खडक येथून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे

# डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वाळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांनी सरळ जाऊन मारुंजी वाय जंक्शन येथून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे

# शनी मंदिर ते भूमकर चौक हा सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) हा दुहेरी मार्ग करण्यात येत आहे.

# सयाजी हॉटेल ते भूमकर चौक हा सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) हा दुहेरी मार्ग करण्यात येत आहे.

# मायकार शोरूम येथून भूमकर चौकात येणा-या वाहनांना उजवीकडे वाळण्यास व सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहन चालकांनी डावीकडे वळून मारुंजी वाय जंक्शन येथून यु – टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे

# जिंजर हॉटेल येथून भूमकर चौकात येणा-या वाहनांना उजवीकडे वाळण्यास व सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहन चालकांनी डावीकडे वळून काळाखडक येथून यु टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

# डांगे चौकाकडून येणाऱ्या वाहनांना भूमकर ब्रिज ओलांडल्यानंतर डावीकडे वळून मायकर शोरुमकडे जाता येणार नाही.

या बदलामुळे हिंजवडीतील चक्राकार वाहतुकीचा जो वाकड परिसरात ताण येत होता तो येणार नाही. बदल नागरिकांच्या अंगवळणी पडला तर त्यांना तो गैरसोयीचा वाटणार नाही, असा विश्‍वास हिंजवडी वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हा बदल शनिवार व रविवार सुट्टी असल्यामुळे जाणावणार नसून सोमवारी (दि. 29) त्याचे परिणाम दिसेल असेही वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.