Bhosari : जागतिक मधुमेह दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉ. गायकवाड डायबेटीस सेंटर आणि लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. 14) रोजी सकाळी नऊ वाजता भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे सर्व उपक्रम होणार आहेत. तसेच यावेळी मधुमेह तपासणी शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

विविध उपक्रम सोहळ्याचे उदघाटन वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार असून आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर राहुल जाधव उपस्थित राहणार आहेत. तर लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेशभाई शहा, उपप्रांतपाल ओमप्रकाश शेटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मोफत मधुमेह तपासणी शिबिरात रक्त शर्करा तपासणी, डोळे तपासणी, पायांच्या नसांची तपासणी, रक्तदाब व हृदय तपासणी करण्यात येणार आहे. बॉडी मास इंडेक्स, बॉडी फॅट अॅनालायझर आणि मधुमेह माहितीपर भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.डॉ. अनु गायकवाड यांचे ‘मधुमेह व कौटुंबिक समस्या’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच या सोहळ्यात मधुमेह झाल्यानंतर तो आटोक्यात आणण्यासाठी छंद जोपासताना मधुमेह मुक्ती काव्य जागर होणार आहे. यामध्ये रामदास फुटाणे, भरत दौंडकर, नारायण पुरे, राजेंद्र वाघ सहभाग घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.