Chikhali : चिखली पोलिसांकडून 37 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी एका तरुणाला वाहनासह ताब्यात घेऊन त्याच्याकडून 37 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) दुपारी बाराच्या सुमारास स्पाईन रोडवर चेरीज स्वीट होम या दुकानासमोर करण्यात आली .

रिजा अहमद साहेब जाद चौधरी (वय 22, रा. काळभोर नगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्नसुरक्षा अधिकारी स्वाती दामोदर मस्के (वय 21) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस स्पाईन रोडने गस्त घालत असताना चेरीज स्वीट होम दुकानासमोरून एक टेम्पो (एम एच 14 / इ एम 5897) वेगात जाताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या टेम्पोची तपासणी केली असता भाजीपाल्याच्या पोत्यात गुटखा आढळून आला. त्याबाबत चौकशी केली असता चौधरी याने तो गुटखा विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. यावरून अन्नसुरक्षा अधिकारी मस्के यांनी घनस्थळी पाहणी करून याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून 37 हजारांचा गुटखा आणि टेम्पो असा एकूण 1 लाख 37 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी चिखली पोलिसांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.