Pune – कसबा पेठेतील 5 दुचाकी जाळल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज- ज्वलनशील पदार्थ टाकून  5 दुचाकी जाळल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी(दि.5) रात्री दीड च्या सुमारास पुण्यातील कसबा पेठेतील माळवदकर गल्ली येथे घडली. पोलीसांनी यातील एका आरोपीस अटक देखील केली आहे.
जय ऊर्फ नुन्या राजेश भोसले (वय 25, रा. मुजुमदार बोळ, कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी मंदार कराडे(वय 22,रा.कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  आरोपी राजेश भोसले याने त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आणि त्यांच्या सोसायटीतील नागरिकांनी  कसबा पेठ येथील सिद्धिविनायक बिल्डींग येथे पार्क केलेल्या एकूण पार्क केलेल्या 5 दूचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळल्या. यामध्ये दूचाकींचे तब्बल 1 लाख 40 हजारांचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री दुचाकी जाळल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून  यातील एका आरोपीला पोलीसांनी शोध घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हे कृत्य करण्यामागे त्याचे नेमके कारण काय होते याचा तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.